breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची अल्झायमर या गंभीर आजाराशी झुंज

मुंबई – अनेक दशकांपासून हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर या दुर्गम आजाराने ग्रासले असल्याची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव याने स्वतः सोशल मीडियावरून दिली आहे.

अजिंक्य देव याने ट्वीट करत त्याची आई अल्झायमर या दुर्गम आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, माझी आई सीमा देव या अल्झायमर या आजाराशी लढत आहेत. संपूर्ण देव कुटुंब ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्राने जे तिच्यावर भरभरून प्रेम केले त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनीही तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना कराव्यात. अजिंक्य यांच्या या ट्वीटनंतर अनेक चाहत्यांनी सीमा देव यांना लवकरात लवकर बरं वाटावे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे याची प्रार्थना केली आहे. अभिनेत्री सीमा देव यांनी राजा परांजपे दिग्दर्शित जगाच्या पाठीवर या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यासोबतच सुवासिनी, आनंद अशा नावाजलेल्या सिनेमांमधूनही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button