breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

औरंगाबादेत कोरोनामुळे पुन्हा 3 मृत्यू, मृतांचा आकडा 58 वर

औरंगाबाद | औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. यासोबतच मृतांचा आकडाही वाढत आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा आकडा हा 58 वर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांची संख्या 1327 एवढी झाली आहे.

महेमुदपुरा येथील 44 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. जय भीमनगर येथील 72 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जाधववाडी येथील 57 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा हा 58 वर पोहोचला आहे. तर औरंगाबादेतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1327 एवढी झाली आहे. तर दिलासादायक वृत्त म्हणजे 770 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button