breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

जेजे रुग्णालयातील कोविड योध्यांसाठी पीस पार्क, अरविंद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई – मुंबईतील जेजे हॉस्पिटल हे मुंबई शहराचा एक अविभाज्य भाग असून येथील डॉक्टर, नर्सेस व पॅरा मेडिकल स्टाफ हजारो रुग्णांची नियमित सेवा करीत असतात. कोरोना महामारीच्या लढाईत जेजे हॉस्पिटलमधील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, नर्सिंग तसेच पॅरा मेडिकल स्टाफ यांनी अमूल्य योगदान दिले असून जे जे हॉस्पिटल मधील डॉक्टर कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांच्या सेवेसाठी डॉ. मनीषा कायंदे यांच्या संकल्पनेतून पीस पार्क नव्याने बनविण्यात आले आहे.

वाचा :-गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आज राज्यभर आंदोलन करणार – रूपाली चाकणकर

जे जे हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या मोकळ्या जागी हे पार्क विकसित केल्यामुळे येथील स्थानिक डॉक्टर , कर्मचारी व त्यांच्या कुटंबीयांना दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या आमदार डॉ मनीषा कायंदे यांच्या संकल्पनेतून व आमदारनिधीतून या पीस पार्क गार्डनचे निर्माण करण्यात आले असून आज २७ डिसेंबर शिवसेना खासदार व माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत व प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पदमश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते या गार्डनचे उद्घाटन करण्यात आले.

या पीस पार्कच्या निर्मितीचे देखणे स्वरूप पाहणे हे नक्कीच अत्यंत समाधानाचे वाटते, तसेच जेजे हॉस्पिटलमधील कोव्हिड योद्धयाना आदरयुक्त सलामी दिल्याचे समाधान मिळाले. जेजे हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मला पुढील कार्यात नक्कीच प्रेरणा देणारा आहे अशी माहिती डॉ. मनीषा कायंदे यांनी दिली.

वाचा :-साखरपुडा कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबियांच्या बसला भीषण अपघात

नव्याने विकसित केलेल्या जेजे हॉस्पिटलमधील या गार्डनमध्ये खेळण्यासाठी नवीन उपकरणे बसविल्यामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या मुलांना खेळण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे, त्यासोबतच या गार्डनमध्ये ओपन जिम विकसित केली असल्यामुळे जे जे हॉस्पिटलच्या आवारात राहत असलेल्या नागरिकांना आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. जेजे हॉस्पिटमधील डॉक्टर तसेच येथील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी उपलब्ध केलेल्या गार्डन मधील सुविधा असलेले हे पहिलेच उद्यान असल्यामुळे येथील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांनी शिवसेना आमदार डॉ मनीषा कायंदे यांचे आभार मानले.

यावेळी स्थानिक आमदार भायखळा विधानसभा श्रीमती यामिनी जाधव, जेजे हॉस्पिटल समूहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, शाखाप्रमुख हेमंत मयेकर व महिला शाखा संघटक मेघा भोयर उपविभाग प्रमुख राम सावंत, डॉ. मुंडे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button