breaking-newsराष्ट्रिय

जीडीपी प्रकरण: नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी स्वीकारले चिदंबरम यांचे आव्हान

जीडीपीच्या आकडेवारीत केलेल्या बदलांबाबत माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी म्हटले आहे. चिदंबरम यांनी बुधवारी जीडीपीच्या नवीन आकडेवारीवर चर्चा करण्याचे आव्हान दिले होते. नव्या आकडेवारीनुसार एनडीए सरकारच्या काळात यूपीए सरकारपेक्षा अधिक आर्थिक विकास झाल्याचे दाखवण्यात आले आहे.

Hon. @PChidambaram_IN Ji,challenge accepted.Let’s discuss & dissect back series data.I gave 3 hrs of detailed interview yesterday & it is somewhat disingenuous of you to say that I asked the media to not ask questions. Do give more coherent reasons for ur difficulty with new data https://t.co/RxF38JZutx

— Rajiv Kumar

राजीव कुमार यांनी यासंबंधी ट्विट केले आहे. आदरणीय चिदंबरमजी, मी तुमचे आव्हान स्वीकारतो. पूर्वीच्या आकडेवारीवर आपण चर्चा करुयात. मी काल सुमारे ३ तासांची विस्तृत मुलाखत दिली आहे. मी माध्यमांना प्रश्न विचारु दिले नाही असा आरोप तुम्ही केला आहे. हा तुमचा अप्रामणिकपणा आहे. तुम्ही यांचे तर्कसुसंगत कारण सांगा.

चिदंबरम यांनी या विषयावर चर्चा करण्याचे आव्हान दिले होते. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी पत्रकारांना त्यांचे प्रश्न उत्तर देण्यालायक नसल्याचे म्हणण्याऐवजी आकडेवारीवर चर्चा करण्यास तयार आहात का ?

कुमार यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले की, चिदंबरम यांनी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (सीएसओ) अधिकाऱ्यांविरोधात अविश्वास प्रकट केला आहे. सीएसओ अधिकाऱ्यांनी या कामासाठी तांत्रिकदृष्ट्या सखोल अभ्यास केला आहे.

सरकारने जानेवारी २०१५ मध्ये २००४-०५च्या ऐवजी आकलनासाठी २०११-१२ हे आधार वर्ष बनवले होते. यापूर्वी जानेवारी २०१० मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. सीएसओने २०११-१२ ला आधार वर्ष बनवत जीडीपी आकड्यांची मालिका बुधवारी प्रसिद्ध केली. नवीन आकडेवारीनुसार भारताची आर्थिक वाढ यूपीए सरकारच्या कार्यकाळात सरासरी ६.७ टक्के राहिली. तर विद्यमान एनडीए सरकारच्या कार्यकाळात ही टक्केवारी ७.३ इतकी राहिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button