breaking-newsआंतरराष्टीय

रोहिंग्यांवर अत्याचार करणारांवर कारवाई करा

  • संयुक्तराष्ट्रांची म्यानमारला सूचना 

संयुक्तराष्ट्रे – रोहिंग्य मुस्लिमांवर अत्याचार करून त्यांना विस्थापित होण्यास भाग पाडणाऱ्यांना हुडकून काढा आणि त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी संयुक्तराष्ट्रांनी म्यानमार सरकारकडे केली आहे. या निर्वासितांना मायदेशी सुरक्षित परतता यावे यासाठीच्या प्रयत्नांना संयुक्तराष्ट्रांनी आता वेग दिला आहे. संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने या संबंधात म्यानमारला इशारा देताना तेथे मानवाधिकारांचे उल्लंघन झाले आहे काय याचीही चौकशी करण्याची सूचना केली आहे. पण या अनुषंगाने सुरक्षा मंडळाने जी भाषा वापरली आहे त्याला चीनने आक्षेप घेतला आहे.

त्यानंतर म्यानमारला उद्देशून एक नवीन निवेदन तयार करण्यात आले त्यात कायद्याच्या राज्याचा मान राखून आपण तेथे हिंसाचार करणाऱ्यांची जबाबदारी निश्‍चीत करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि अत्यंत पारदर्शी पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करावी अशी सुचना म्यानमारला करण्यात आली आहे. निर्वासितांना परत येण्यासाठी म्यानमारने अनुकुल वातावरण तयार करावे आणि त्यांचे सुरक्षित पुनर्वसन करावे अशी सूचनाही म्यानमारला करण्यात आली आहे. रोहिंग्य मुस्लिमांवर तेथील बौद्ध नागरीक आणि लष्कराने केलेल्या हल्ल्यांमुळे सुमारे सात लाख मुस्लिमांनी तेथून पलायन करून बांगल देशात आश्रय घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button