breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

जालन्यात आणखी अकरा जणांना कोरोनाची बाधा, जिल्ह्याची रुग्णसंख्या 185 वर

जालना | जालन्यात आणखी नवीन अकरा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या ही आता 185 वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये शहरातील मोदीखाना भागातील सहा जणांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. या बाधितांमध्ये दोन महिलांसह चार पुरुषांचा समावेश आहे. तर शहरातीलच क्रांतीनगर येथील एक, मंठा तालुक्यातील नानसी येथे दोन आणि आकणी येथील एका महिलेचा समावेश आहे. त्यामुळं जिल्ह्याची रुग्ण संख्या ही 185 वर जाऊन पोहोचली आहे. रुग्णांचा आकडा हा चढाच असल्यानं जिल्हावासियांची चिंता अधिक वाढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button