breaking-newsक्रिडा

जायबंदी विल्यम्सन इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला मुकणार

वेलिंग्टन : न्यूझीलंडचा अनुभवी कर्णधार केन विल्यम्सन कंबरेला झालेल्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी ट्वेन्टी-२० क्रिकेट मालिकेला मुकणार आहे. विल्यम्सनच्या अनुपस्थितीत टिम साऊदी न्यूझीलंडचे नेतृत्व करणार आहे.

न्यूझीलंड-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला शुक्रवार, १ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून त्यानंतर उभय संघात दोन कसोटी सामनेही खेळले जाणार आहेत. विश्वचषकाच्या अंतिम फेरीनंतर प्रथमच हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत.

‘‘विल्यम्सनला यापूर्वी मार्च महिन्यात बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतसुद्धा या दुखापतीने त्रस्त केले होते. त्याला यातून सावरण्यासाठी किमान दोन आठवडय़ांचा कालावधी लागणार असल्याने साऊदीकडे कर्णधारपद सोपवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे,’’ असे न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड म्हणाले. त्याशिवाय वेगवान गोलंदाज लॉकी फग्र्युसनचा पहिल्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठीच संघात समावेश करण्यात आला असून उर्वरित दोन लढतींमध्ये ट्रेंट बोल्ट संघात पुनरागमन करेल, असेही स्टेड यांनी सांगितले.

न्यूझीलंड संघ : टिम साऊदी (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, कॉलिन डीग्रँडहोम, लॉकी फग्र्युसन, मार्टिन गप्टिल, स्कॉट कुगलेन, डॅरेल मिचेल, कॉलिन मनरो, जिमी नीशाम, मिचेल सँटनर, टिम स्टेइफर्ट, इश सोधी, रॉस टेलर, ब्लेर टिकनक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button