breaking-newsराष्ट्रिय

जायकोव-डी या कोरोनावरील लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू

नवी दिल्ली – कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला असताना भारतासाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. जायडस केडिलाच्या जायकोव-डी या कोरोनावरील लसीने मानवी चाचणीचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. त्यामुळे तिची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी आजपासून सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणीत ही लस सुरक्षित असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे, असे कंपनीचे अध्यक्ष पंकज पटेल यांनी सांगितले.

जायडस केडिला या कंपनीने कोरोनावर ही लस शोधली आहे. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीत ज्या लोकांना ही लस दिली. त्यांच्यावर २४ तास आरोग्य तज्ज्ञांनी बारीक लक्ष ठेवले होते. त्यांच्यावर कोणताही विपरित परिणाम लसीचा झाला नसल्याचे आढळले. त्यामुळे या लसीने मानवी चाचणीचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार केला आहे, असे पटेल म्हणाले. दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत या लसीचे डोस आणखी काही जणांना देण्यात येणार आहेत. नंतर त्याचे निरीक्षण केले जाणार आहे. या लसीमुळे कोरोनापासून बचाव होत असल्याचे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे तपासणीत आढळले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button