breaking-newsताज्या घडामोडीपुणे

गडचिरोली भागात पोलीस अधिकाऱ्याचे आकस्मित निधन

चिंचवड – गडचिरोली भागात मागील वर्षी सात नक्षलवाद्यांना कंठस्थान घालणाऱ्या योगेश भरत गुजर (वय ३३)रा.चिंचवड,पुणे या पोलीस दलातील सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याच्या आकस्मित मृत्यूची घटना शुक्रवारी मध्यरात्री गडचिरोली भागात घडली. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या चिंचवड मधील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. उपस्थितांनी अश्रू नयनांनी श्रध्दांजली वाहिली. शनिवारी सकाळी नऊ वाजता पिंपरी मधील भाटनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसागर लोटला होता.

योगेश गुजर यांच्या निधनाची बातमी कळताच परिसरात शोककळा पसरली. हसतमुख व शांत स्वभाव असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख होती. सुरवातीला दोन वर्षे ते सैन्य दलात सेवा केल्यानंतर पोलीस दलात कार्यरत झाले होते. आई-वडील,पत्नी, दोन बहिणी व एक लहान भाऊ असा त्यांचा परिवार आहे. एक वर्षा पूर्वी त्यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर पत्नीही त्यांच्या समवेत रहात होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अनेकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. रात्री उशिरा त्यांचे पार्थिव नागपूरहून विमानाने पुण्यात आणण्यात आले.

पंढरपूर जवळील टेंभुर्णी हे त्यांचे मुळ गाव. योगेश यांचे वडील सैन्यदलात सुभेदार पदावर सेवेत होते. योगेश यांचे शिक्षण खडकीतील बी.जे.स्कुल मध्ये झाले.२००८ पासुन ते चिंचवड येथील दळवीनगर( समर्थ कॉलनी )मध्ये रेणुका इमारतीत रहात होते. २०१३ च्या बॅचमध्ये ते उत्तीर्ण होऊन पोलीस दलात दाखल झाले. अतिशय हुशार व जिगरबाज अधिकारी अशी त्यांची ओळख होती. नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यासाठी ते नेहमी दक्ष असायचे. त्यांच्या निधनाची बातमी नातेवाईकांना मिळताच त्यांचे नातेवाईक व मित्र परिवार मोठ्या संख्येत त्यांच्या राहत्या घरी उपस्थित होते. शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button