breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

शिवेंद्रराजेंनाही भेटणार नाही तर त्यांना गाठणारच- छत्रपती उदयनराजे भोसले

  • सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न

वाई |

सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनी मागील दोन दिवस साताऱ्यातील प्रमुख नेत्यांची भेट सत्ताधारी पॅनल मधून उमेदवारी मिळावी यासाठी भेट घेण्याचा सपाटा लावलाय.पण त्यांना अजून बँकेचे अध्यक्ष आमदार व त्यांचे बंधू शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट होऊ शकलेली नाही.या भेटी विषयी पत्रकारांनी उदयनराजेंना झेडलं असता शिवेंद्रसिहराजेंना भेटणार आहेच जर भेटले नाही तर त्यांना गाठणारच असे माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी सर्वपक्षीय पॅनेलची उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.बँकेचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उदयनराजे यांना उमेदवारी न देण्याबाबत ठाम आहेत. त्यांचे मत विचारात घेतल्याशिवाय याबाबतचा निर्णय होणार नाही.आपल्याला या पॅनेलमध्ये घ्यावे या मागणीवर ठाम रहात खासदार उदयनराजे भोसले यांनी फलटण येथे जाऊन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले उदयनराजे यांना उमेदवारी न देण्याबाबत ठाम आहेत त्यांचे मत विचारात घेतल्याशिवाय याबाबतचा निर्णय होणार नाही.त्यानंतर कराड येथे जाऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलासराव उंडाळकर यांचे चिरंजीव उदय पाटील,अतुल भोसले यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांनी भेट घेतली असता मी जिल्ह्याच्या व कोणाच्या राजकारणात ढवळा-ढवळ केली आहे का ,मग मी का नको ,मी आता ढवळा-ढवळ करतो असे सांगितले.आज त्यांनी त्यांचे पूर्वाश्रमीचे मित्र गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व आमदार मकरंद पाटील यांची भेट घेतली. यावेळी बँकेचे मागील पाच वर्षात शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे निकटवर्तीय व त्यांच्या बरोबरीने बँकेचे दिशादर्शक नितीन पाटील यांची भेट घेण्यासाठी गेले पण त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे मित्र आमदार मकरंद पाटील व जेष्ठ बंधू मिलिंद पाटील यांची भेट घेतली.

उमेदवारीच्या ठाम भूमिका पटवून देण्यात व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मन वळविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे नितीन पाटील यांची भेट मात्र उदयनराजेंना होऊ शकली नाही. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली असता जिल्हा बँकेच्या निवडणुकी संदर्भात भेट घेतल्याची चर्चा सुरू आहे . या वेळी उदयनराजेंना शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रश्नावर पत्रकारांनी छेडलं असता शिवेंद्रसिंहराजेंची भेट झाली नाही. तरी त्यांना गाठणारच असं वक्तव्य उदयनराजेंनी केल‌ं . आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भुमिका या निवडणुकीत महत्वाची असल्यामुळे उदयनराजेंच्या या वक्तव्याला खुप महत्व प्राप्त झालं आहे.दरम्यान ‘शिवेंद्रसिंहराजेंना भेटणं गरजेचं आहे ते पुण्याला गेल्याचं कळतंय पण त्यांना भेटणार आणि ते नाही भेटले तर त्यांना गाठणारच’ असे उदयनराजेंनी माध्यमांना सांगितले.उमेदवारी अर्ज काढून घ्याव यासाठी माझ्यावर दबाव येतोय म्हणून मला संरक्षण मिळावं यामुळे मी राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेतल्याची मिस्कीलीही उदयनराजे भोसले यांनी केली.तुम्ही जिल्ह्याच्या राजकारणात ढवळा-ढवळ करण्याबाबत काहितरी बोलल्याची आठवण पत्रकारांनी करताच ते म्हणाले ,तुम्ही मात्र काही ढवळा-ढवळ करू नका.

साताऱ्यात जिल्हा बँकेच्या निवडणूकीमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच गरम असताना व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना पुण्याच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुत्रसंसर्गाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे उपचार सुरु आहेत.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे उपचार सुरु आहेत. रामराजे निंबाळकर नियमित तपासणी साठी पुण्यामध्ये एका रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते, त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे, त्यांची तब्येत उत्तम आहे, काळजी करण्याचे कारण नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अंकुश काकडे यांनी पुण्यात सांगितले.त्यामुळे आज दिवसभर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. दरम्यान सातारा जिल्हा बँकेच्या उमेदवारी बाबत सत्ताधारी सर्वपक्षीय पॅनल अंतिम स्वरूप देण्याबाबत आज रात्री प्रमुखांची आज बैठक होणार आहे.पॅनल ठरविताना अंतिम मंजुरी पक्षप्रमुख शरद व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंजुरी घेण्यात येणार आहे. आज बुधवार (दि १०)रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस आहे.

दारम्यान उदयनराजेंच्या उमेदवारीचा निर्णय तुमच्या स्थानिक पातळीवरचा आहे. त्यावर तुम्हीच एकत्र बसून निर्णय घ्या आणि शिवेंद्रसिंहराजेंच्या विचारा आणि ते म्हणतील तसा निर्णय घ्या.शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर ती जबाबदारी सोपवा. त्यांचाही निर्णय यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे असे शरद पवार यांनी बारामतीत नुकत्याच प्रमुखांच्या झालेल्या या बैठकीत साताऱ्यातील जेष्ठ नेत्यांना सांगितले .मात्र त्यांनी सर्वांना सावध भूमिका घेण्याची सूचना केली असल्याने उदयनराजें बाबत काय अंतिम निर्णय होणार हे मध्यरात्री उशिरा समजणार आहे. जिल्हा बँकेची निवडणूक पक्षिय पातळीवर होत नाही. मात्र, तरिही बँकेतील संघर्ष टाळला जावा, यासाठी सर्वोत्तम नेत्यांपर्यंत जावून मी बोलणी केली आहेत असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले आहे. संघर्षामुळे वेगळा मेसेज जातो, त्यामुळे शक्यतो तो टाळावा, अशी भूमिका होती व आहे. त्यामुळे संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न झालेच नाहीत, असे म्हणणे योग्य नाही. झालेल्या प्रयत्नाला अपयश आले असेही अजून आपण म्हणू शकत नाही, त्यामुळे थांबा व पहा, अशीही प्रतिक्रिया नोंदवत पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button