breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

…अन्यथा अमेरिकेत ७०% नागरिकांना कोरोना होईल : संशोधन

वॉशिंग्टन | लस तयार न झाल्यास अमेरिकेत कोरोनाने ७० टक्के लोक बाधित होतील. मिनेसोटा विद्यापीठाच्या तज्ञांनी हा दावा केला आहे. या विद्यापीठाचे संसर्गजन्य आजार शोध विभागाचे संचालक डॉ. मायकेल ओस्टेरहोम यांनी सांगितले की, हा विषाणू आराम करणारा नाही. लस किंवा हर्ड इम्युनिटी वाढली तरच कोरोना रोखता येऊ शकतो. अमेरिकेची अंदाजे लोकसंख्या ३३१००२६५१ अाहे.

सध्या अमेरिकेत १ टक्क्यापेक्षाही कमी म्हणजे २१६२२६१ कोरोनाबाधित आहेत. ११७८५८ मृत्यू झाले आहेत. डॉ. ओस्टेरहोम यांनी सांगितले की, नव्या आकडेवारीवरून दिसते की, अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी ८ मध्ये संसर्ग स्थिर आहे. २२ मध्ये प्रकरणे वेगाने वाढत आहेत. २० राज्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण घटले आहे. बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनच्या तज्ञ डॉ. नाहिद भदेलिया यांनी सांगितले की, दक्षिण आणि पश्चिम राज्यांमध्ये स्थिती जास्त वाईट आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button