breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

२७ जानेवारीपासून शाळेची वाजणार ‘घंटा’

५ ते ८ वी चे वर्ग सुरु करण्यास राज्य शासनाची मान्यता   

प्रदीप लोखंडे

पिंपरी | प्रतिनिधी

राज्यातील ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सोमवारी, दि. १८ जानेवारी २०२१ रोजी त्याबाबत अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार २७ जानेवारी २०२१ पासून कोविडच्या नियमांचे पालन करून ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरु होणार आहेत. त्यामुळे २७ जानेवारीपासून पुन्हा शाळेची घंटा वाजणार असल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२० – २१ मध्ये ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. १३ नोव्हेंबर २०२० पासून हे वर्ग सुरक्षितपणे टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढली. सध्या राज्यातील कोविड बाधित रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.  सद्यस्थितीत ही साथ नियंत्रणात आली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शाळांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाय योजना करून शाळा सुरु करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये व त्याचा विद्यार्थी व पालकांवर मानसिक त्रास होऊ नये या हेतूने शाळा सुरु करण्याचे हितावह राहणार आहे. राज्यातील शाळा सुरु करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागही सहमत आहे. या नुसार राज्यातील ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्याचा प्रस्ताव होता.

त्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेत ५ ते ८ वी चे वर्ग २७ जानेवारीपासून सुरु करण्यास मान्यता दिली असल्याची माहिती अध्यादेशाद्वारे दिली. कोविड 19 बाबत केंद्र व राज्य शासनाच्या सुचनांचे पालन करण्यात यावे, अशी सुचना देण्यात आली. तसेच १५ जून, २९ ऑक्टोबर व १० नोव्हेंबर २०२० च्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याच्या सुचना देखील राज्य शासनाने परिपत्रकाद्वारे दिल्या आहे. संबधित जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आदींना शाळा व वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया –

अद्याप आमच्याकडे कोणतेही परिपत्रक किंवा सुचना आल्या नाहीत. शनिवार पर्यंत कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. सोमवारी अद्यादेश आला असेल तर त्याबाबत माहिती घेऊन पुढील कार्यवाही सुरु करू.

– पराग मुंढे, शिक्षणाधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button