breaking-newsराष्ट्रिय

जम्मू काश्मीर : सोपोरमध्ये सीआरपीएफ जवानांच्या तुकडीवर ग्रेनेड हल्ला

नवी दिल्ली – जम्मू काश्मीर मधील सोपोरमध्ये सीआरपीएफच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्यामध्ये सीआरपीएफचे 5 जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर जखमी जवानाची प्रकृती स्थिर आहे.

पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘जखमी जवानांना रूग्णलयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसरास घेराव घालण्यात आला आहे आणि शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे’.

याआधी सोमवारी सकाळी घाटीमध्ये सेना आणि जम्मू काश्मीर पोलिसांतर्फे एक मोठी शोधमोहिम करण्यात आली होती. यादरम्यान पुलवामा आणि शोपिंयामधील  20 गावांमध्ये शोधमोहिम करण्यात आली. यावेळी लोक आणि सुरक्षादलामध्ये चकमक झाल्याचे समोर आले होते आणि यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button