आंतरराष्टीय

जपानचे “मोमो-2′ रॉकेटचे प्रक्षेपण पुन्हा एकदा अपयशी

टोकियो, जपानच्या खासगी कंपनीने विकसित केलेले रॉकेट अवकाशात सोडण्याचा दुसरा प्रयत्न आज अपयशी ठरला. अंतराळामध्ये सोडल्यानंतर थोड्याच अवधीमध्ये या रॉकेटचा स्फोट झाला आणि ते नष्ट झाले. खासगी कंपनीच्या मदतीने अंतराळामध्ये “मोमो-2′ हे रॉकेट सोडण्याचा हा प्रयत्न त्यामुळे अपयशी ठरला आहे. इंटरनेटसेवा पुरवणाऱ्या “इंटरस्टेलर टेक्‍नोलॉजीस’ या कंपनीने हे मानवविरहीत रॉकेट विकसित केले होते. हाक्काइदो राज्याच्या दक्षिणेकडील तैकी येथून पहाटे 5.30 वाजता हे रॉकेट अवकाशात सोडण्यात आले होते.

रॉकेट अवकाशात सोडल्यानंतर काही सेकंदातच ते कोसळले आणि स्फोट होऊन ते नष्ट झाले. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. या रॉकेटच्या माध्यमातून अंतराळ संशोधनाची उपकरणे 100 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचवण्यात येणार होती. यापूर्वी गेल्यावर्षी जुलै महिन्यात सोडण्यात आलेल्या रॉकेटचा संपर्क प्रक्षेपणानंतर काही मिनिटांमध्येच तुटला होता. आज झालेल्या अपयशी प्रक्षेपणानंतरही रॉकेट विकासाचा कार्यक्रम सुरूच ठेवला जाईल असे इंटरस्टेलर टेक्‍नोलॉजीजनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button