breaking-newsआंतरराष्टीय

बुध ग्रहाचे सोमवारी अधिक्रमण

  • उत्तर अमेरिका, ओसेनिआ, न्यूझीलंडमधून निरीक्षणाची पर्वणी

येत्या सोमवारी बुध ग्रह हा सूर्यबिंबावरून अधिक्रमण करणार आहे. मात्र, हे अधिक्रमण भारतामध्ये दिसणार नसून केवळ उत्तर अमेरिका, ओसेनिआ आणि न्यूझीलंड या देशांमध्येच दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. तसेच अशा प्रकारचे अधिक्रमणचा योग तेरा वर्षांनंतर पुन्हा येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पृथ्वीवरून पाहताना बुध ग्रह जेव्हा सूर्यबिंबावरून जाताना दिसतो, त्याला ‘बुध ग्रहाचे अधिक्रमण’ असे म्हणतात. बुध ग्रहाप्रमाणेच शुक्राचे अधिक्रमणही पृथ्वीवरून दिसते. बुधाचे अधिक्रमण मात्र दुर्बिणीतून पहावे लागते. सूर्यग्रहणात जसे चंद्रबिंब सूर्यबिंबावरून जाताना दिसते, तसाच हा प्रकार असतो, असे सोमण यांनी सांगितले. यापूर्वी ९ मे २०१६ रोजी बुध ग्रहाचे अधिक्रमण झाले होते. त्यानंतर आता येत्या ११ नोव्हेंबर रोजी बुधाचे अधिक्रमण होत आहे. हे अधिक्रमण भारतातून दिसणार नाही. दक्षिण आशिया, यूरोप, आफ्रिका, दक्षिण ग्रीनलँड, अंटाक्र्टिका, दक्षिण अमेरिका, अलास्का सोडून उत्तर अमेरिका, ओसेनिआ आणि न्यूझीलंड येथून हे अधिक्रमण दिसणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button