breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जनसंपर्क कार्यालय तोडफोडीच्या निषेधार्त चिखलीत कडकडीत बंद

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखलीतील जनसंपर्क कार्यालयाची काल शुक्रवारी (दि. 7) टवाळखोरांनी तोडफोड केली. याच्या निषेधार्त चिखली, मोरेवस्ती, साने चौक, कृष्णानगर या बाजारपेठेतील व्यापारी, व्यावसायिकांनी आज कडकडीत बंद पाळला. मात्र, फरार हल्लोखोरांना पकडण्यात पोलिसांनी अद्याप यश आले नाही.

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या साने चौक येथील कार्यालयाची काही हल्लेखोरांनी हत्यारांसह तोडफोड केली. कार्यालयातील कर्मचारी महिलेला मारहाण केली. कार्यालयाचे मोठे नुकसान केले. भर चौकात, रहदारीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने व्यापारी आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यातील गुन्हेगार सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाले आहेत. त्याच्या आधारे पोलिसांनी तपास कार्याला गती दिली. 12 तासाच्या आत हल्लेखोरांना ताब्यात घेण्याचा इशारा देखील साने यांनी दिला आहे. तरी, अद्याप आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले नाही.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्त चिखलीतील साने चौक, मोरे वस्ती, कृष्णानगर भागातील दुकाने दिवसभर बंद आहेत. व्यापारी, व्यावसायिकांनी आज कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध केला आहे. दुपारी साडेचार वाजेपर्यंत या भागातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button