breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मद्यधुंद तरुणींचा चिंचवड पोलीस ठाण्यात दंगा

पिंपरी –  चिंचवड पोलीस ठाण्यात रात्री १२ च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेतील दोन तरुणींना पोलिसांनी हटकले. त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले असता, त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. या प्रकरणी त्या दोघींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

स्मिता किशोर बाविस्कर (वय 22, रा. ओटास्कीम, निगडी), प्रिया प्रदीप पाटील (वय 30, रा. पाटील नगर, चिखली) आणि आकाश मिलिंद कोरे (वय 25, नढे नगर, काळेवाडी) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस आज मध्यरात्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनसमोर स्मिता, प्रिया आणि आकाश हे तिघेजण संशयितरित्या थांबलेले आढळून आले. त्यांच्याजवळ नंबर नसलेली दुचाकी होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तरुणींनी पोलिसांना अर्वाच्य भाषा वापरली आणि त्यांच्याशी हुज्जत घातली.

मद्यधुंद अवस्थेतील दोन तरूणी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या एका तरूणाला पोलिसांनी चिंचवड पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेले. तेथे नेताच त्यातील एक तरूणी जोरजोरात आरडा ओरडा करू लागली. पोलीस अधिकाऱ्यांना उलट उत्तरे देऊ लागली. एवढेच नव्हे तर कसली चौकशी करताय, करा, आम्हीही बघून घेऊ अशा शब्दात ती पोलीस  धमकावत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button