breaking-newsक्रिडा

जडेजा दशकातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक

  • भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचे मत

भारतीय संघाचा क्षेत्ररक्षकणाचा स्तर दिवसेंदिवस सुधारताना दिसतो आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा दशकातील सर्वात भारी क्षेत्ररक्षक आहे असे मत भारतीय क्रिकेट संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी व्यक्त केले.

भारताने नुकतीच दक्षिण आफ्रि के विरुद्धची कसोटी मालिका निर्विवाद वर्चस्व राखत जिंकली. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिके त आफ्रि कन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करत ‘व्हाईटवॉश’ दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा के ल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रि के चा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो- ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने जिंकली.भारताने मालिके त फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक अशा तिन्ही आघाडय़ांवर जोरदार कामगिरी के ली. आफ्रि के चा कर्णधार फाफ डु प्लेसिस यानेही भारताच्या क्षेत्ररक्षणाची स्तुती के ली. या दरम्यान भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी भारतीय संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण हे सांगितलं आहे. इतके च नव्हे तर तो दशकातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असल्याचेही श्रीधर यांनी म्हटले आहे.भारतीय संघाचा क्षेत्ररक्षणाचा स्तर दिवसेंदिवस सुधारताना दिसतो आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा दशकातील सर्वात भारी क्षेत्ररक्षक आहे. जडेजा मैदानावर असतो तेव्हा संघातील खेळाडूंमध्ये एक वेगळीच उर्जा दिसून येते. तो प्रतिस्पर्धी संघाला एकही धाव सहजासहजी मिळवू देत नाही. प्रत्येक धावेसाठी प्रतिस्पर्धी फलंदाजांनी झगडावे लागते. त्याला उत्तम क्षेत्ररक्षणाची देणगीच मिळाली आहे. गेल्या दशकात भारतीय संघाला लाभलेला जडेजा हा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक होता, असे श्रीधर यांनी सांगितले. दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ ते १० नोव्हेंबरमध्ये तीन टी २० सामने होणार आहेत. तर १४ ते २६ नोव्हेंबरमध्ये २ कसोटी सामने होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button