breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

जगभरात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत असतानाच चीनमध्ये मात्र सध्या दिलासादायक वातावरण

जगभरात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत असतानाच चीनमधील वुहानमध्ये मात्र सध्या दिलासादायक वातावरण पहायला मिळतय… वुहानमध्ये पाचव्या दिवशीही कोरोना विषाणूचेा एकही रुग्ण समोर आलेला नाही. परंतु, विदेशातून आलेले ३९ आणखी लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. चीनमधील वुहान याच शहरापासून डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूची दहशत सुरू झाली… 

कोरोना विषाणूमुळे चीनमधील वुहानमध्ये कडक पावले उचलली गेली होती. वुहानमध्ये सुमारे ५६ मिलियन लोकांना घरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे कोरोना विषाणूने संक्रमिक लोकांमध्ये घसरण झाल्याचे सांगण्यात येते. तर याच महिन्याच्या सुरुवातीला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही वुहानचा दौरा केला होता आणि आरोग्य सेवेचा आढावा घेतला होता. 

बीजिंगला येणाऱ्या सर्व विमानांना दुसऱ्या शहरात वळवण्यात येत आहे. तिथे प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जाईल, असे चीनच्या विमान सेवेशी निगडित एका अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. चीनमध्ये कोरोना विषाणूनचे आतापर्यंत ८१ हजाराहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. त्याचबरोबर ३२७० लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

जगभरात कोरोना विषाणूने संक्रमित लोकांची संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. इटलीपासून भारत आणि अमेरिकापर्यंत यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. याचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button