ताज्या घडामोडी

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

पिंपरी (Pclive7.com):- दरवर्षीप्रमाणे भक्ती शक्ती समुह शिल्प निगडी येथे शुक्रवार दिनांक दोन रोजी संत तुकाराम महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत लहू लांडगे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत तुकाराम महाराजांनी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा विरोधात अभंगातून कीर्तनातून आवाज उठवला आजही त्यांच्या अभंगातून अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा विरोधात लढण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन माजी नगरसेवक ह.भ.प.जयंत आप्पा बागल यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
माजी नगरसेवक सचिन चिखले म्हणाले की, पुढील वर्षापासून संत तुकाराम महाराज यांची जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात तीन दिवस साजरा करूयात. प्रबोधन पर्वच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे विचार जनतेत रुजवून जनतेचे प्रबोधन मोठ्या प्रमाणात करूया असे मनोमन व्यक्त केले. तसेच मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव यांनी आजही तुकोबाराय कुठल्यातरी रूपाने कुठेतरी जीवंतच आहेत, ते तुम्हाला देहूत भेटणार नाहीत वा मंदिरातही भेटणार नाहीत. जिथं अन्याय, अनीती, व्यभिचार, भ्रष्टाचार,अनैतिकता असते, तिथं उशीरा का होईना ते विद्रोह घेवूनच जन्माला येतात.अन् प्रस्थापितांच्या विरुद्ध विद्रोह करून समतेसाठी लढा उभारतात असे म्हटले.
याप्रसंगी ह‌.भ.प.तानाजी काळभोर,ह.भ. प.देवराम कोठारे महाराज, ह.भ.प.अनिल सावंत महाराज, भारत विठ्ठलदास, शरद थोरात, कल्पना गीड्डे, यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रास्ताविक नकुल भोईर यांनी केले. सूत्रसंचालन निरंजनसिंह सोखी यांनी केले. तर आभार वैभव जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे जिजाऊ ब्रिगेडच्या माणिक शिंदे, राष्ट्रवादीच्या सपना शिंदे,मोनल शिंत्रे, रोहिदास शिवणकर, वसंत पाटील, शशिकांत आवटी, अभिषेक म्हसे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार, छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संजय जाधव, विठ्ठलराव गायकवाड,सुनीता शिंदे, श्रीराम नलावडे, कालिदास कटाळे, शरद आवटे, यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button