ताज्या घडामोडीमुंबई

ठाकरे सरकारवर ‘वॉटरमॅन’ संतापले; ‘इथल्या नद्यांना नाले बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील’

कल्याण |  कल्याण खाडीसह उल्हास आणि वालधुनी नद्या अखेरच्या घटका मोजत आहे. आणि सरकार तर या नद्यांना नाले बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी उद्विग्न टीका वॉटरमॅन अशी ओळख असणाऱ्या मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंह यांनी केली आहे. राजेंद्र सिंह यांनी आज कल्याण खाडीसह उल्हासनर, अंबरनाथ, बदलापूरमधील उल्हास आणि वालधुनी नद्यांच्या दुरवस्थेची जागरूक नागरिक, विद्यार्थ्यांसोबत पाहणी केली.

आपण आज उल्हानगर, अंबरनाथ बदलापूर येथील नद्यांची पाहणी केली. त्यांना आपण नदी बोलूच शकत नाही. त्या एका घाणेरड्या नाल्याप्रमाणे दिसून येत असल्याची खंत राजेंद्र सिंह यांनी बोलून दाखवली. तसेच जर इथली लोकं जागरूक नसती तर सरकार दरबारी या नद्यांचे नाले अशीच नोंद आज झाली असती. आणि आपले सरकार या नद्यांना नाले बनवण्यात प्रयत्नशील आहे. मुंबईतील ५ नद्यांनाही त्यांनी नाले बनवले होते. पण आम्ही अशाच प्रकारे सर्व नद्यांची पाहणी करून सरकार दरबारी त्यांची नदी अशी नोंद करून घेतल्याचे राजेंद्र सिंह यांनी सांगितले.

या नद्या सध्या आयसीयूमध्ये आहेत. त्यांना वाचवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न झाले नाहीत, तर या नद्या वाचणार नाहीत. कल्याण खाडीशेजारी असणाऱ्या डंपिंग ग्राउंडबाबत त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या खाडीशेजारी असणारे डंपिंग ग्राउंड हा सर्वात मोठा अपराध आहे. नदीशेजारी कधीही डंपिंग ग्राउंड असता कामा नये. या डंपिंग ग्राउंडमधील कचऱ्याचे रासायनिक घटक पाण्यात मिसळतात. यामुळे तिथली पाणी प्रदूषित होतेच यासोबतच जमीनही पूर्णपणे पडीक बनते. यामुळे सरकारने तातडीने ते बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी वॉटर मॅन राजेंद्र सिंह यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण सावंत यांच्यासह विविध जागरूक नागरिक आणि कल्याणामधील एका खासगी शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना राजेंद्र सिंह यांनी नद्या वाचवण्याचे महत्त्व अधोरेखित करून सांगितले. तसेच त्यांच्या परीने नद्या वाचविण्याच्या मोहिमेत हातभार लावण्याचे आवाहनही केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button