breaking-newsपुणेमहाराष्ट्र

छुप्या दंड वसुलीला स्थायी समिती मान्यता देणार का ?

“नो पार्किंग’चा पुणेकरांच्या खिशाला “चाप’ 

पुणेकरांना मोजावे लागणार 5 हजार रुपयांपर्यंत शुल्क 

 
पुणे – शहरात “नो पार्किंग’मध्ये उभ्या केलेल्या वाहनांसाठी सुमारे 1 ते 5 हजार रुपयांपर्यंतचे शुल्क आकारले जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून ही दंडाची रक्‍कम वसूल करण्यात येणार असून त्याच्या माहितीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे छुप्या पद्धतीने पालिकेकडून शहरात पार्किंग धोरण राबवून पुणेकरांवर दंडाची रक्‍कम वसूल करण्यास स्थायी समिती मान्यता देणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणे, वाहनांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी शहरात स्वतंत्र पार्किंग धोरण प्रस्तावित केले आहे. परंतु, या प्रस्तावर नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया व विरोधकांचा तीव्र विरोध लक्षात घेता मुख्यसभेत मध्यरात्रीमध्ये चर्चा होऊन केवळ काही रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यानंतर गेल्या सात-आठ महिन्यांत प्रायेगिक तत्त्वावर देखील पार्किंग धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही.

कारवाई करण्यास सुरुवात 
यामुळे आता प्रशासनाने छुप्या पध्दतीने व मुख्य सभेच्या ठरावाचा आधार घेत “नो पार्किंग’मध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर रिमुव्हल चार्जेच्या नावाखाली कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शहराच्या हद्दीत कोठेही “नो पार्किंग’मध्ये वाहन लावल्यास नागरिकांना मोठा दंड द्यावा लागणार आहे. यामध्ये शहरातील सर्व रस्त्यांवर निर्बंध असलेल्या ठिकाणी कार, जीप पार्क केल्यास …….. हजार रुपये, रिक्षा व तीन चाकी टेम्पोसाठी दीड हजार रुपये आणि दुचाकीसाठी तब्बल ……. हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. यामध्ये “नो पार्किंग’मध्ये लावलेली वाहने वाहतूक पोलिसांकडून न उचलता जागेवरच दंड वसूल करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button