breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार गाैतम चाबुकस्वार यांना पिंपरीतून शिवसेनेची उमेदवारी जाहीर

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार ॲड. गाैतम चाबुकस्वार यांना शिवसेनेने पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिवसेनेतील इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

मुंबईत आज मातोश्रीवर शिवसेनेच्या सर्व विद्यमान आमदारांना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्मचे वाटप केले. पिंपरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळेल की भाजपच्या मित्र पक्षाला मिळणावर याविषयी खलबते सुरु होते. तसेच २०१४ रोजी भाजपने आरपीआयला जागा सोडलेली होती. या पार्श्वभूमीवर आरपीआय आठवले गटाने ही पिंपरीच्या जागेसाठी जोरदार प्रयत्न चालविले होते. तसेच शिवसेनेचे एक विद्यमान नगरसेवक, युवा सेनेचे पदाधिकारी देखील पिंपरीच्या तिकीटासाठी देव पाण्यात बुडवून बसले होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आमदार गाैतम चाबुकस्वार यांना एबी फॉर्म हातात दिली. ‘पक्ष तुमच्या पाठिशी आहे, कामाला लागा, निवडून या’ असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button