breaking-newsराष्ट्रिय

छत्तीसगडमध्ये हत्तीला सॅटेलाइट कॉलर लावण्याचा प्रयोग यशस्वी

अंबिकापूर (छतीसगड) – छत्तीसगडमध्ये वन्य हत्तीला सॅटेलाईट कॉलर लावण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. बलरामपूर वनविभागातील रेवतपूर येथे बहरादेव नावाच्या एका हत्तीला सरगुजा वनविभागचे सीसीएफ (चीफ कॉन्झरवेटर ऑफ फॉरेस्ट) केके बिसेन यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सॅटेलाईट कॉलर लावली. कॉलर लावल्याने हत्तीच्या हालचालींची सूचना मिळत राहून तो ज्या भागात जात असेल तेथील नागरिकांना सावध करता येणार आहे. त्यामुळे हत्तीपासून होणारे नुकसान टाळणे शक्‍य होणार आहे.

बहरादेव हा सुमारे 9 फूट उंचीचा आणि 25-30 वर्षे वयाचा एकटा फिरणारा हत्ती आहे. गावामध्ये शिरून घरे पाडणे वा शेतीचे नुकसान करणे अशा प्रकारांमुळे वनविभागाला दररोज 75 हजार ते 1.5 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी लागत होती. आता बहरादेवच्या हालचालींची आगाऊ सूचना मिळाल्याने हे नुकसान टाळता येणार आहे.

वनविभागाला सहा कॉलर्स देण्यात आल्या असून बहरादेवच्या सॅटेलाईट कॉलरचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हत्तींच्या पाच कळपांच्या म्होरक्‍यांना सॅटेलाईट कॉलर लावण्यात येणार आहे. परिणामी हत्तींच्या कळपांपासून होणाऱ्या नुकसानीला मोठ्या प्रमाणात आळा घालता येणार आहे.

दक्षिण आफ्रिकेत तयार करण्यात आलेल्या सॅटेलाईट कॉलरचे वजन 15 किलोग्राम असून तिची किंमत 3 लाख रुपये आहे. कॉलरच्या ा वापरासाठी वर्षाला एक लाख रुपये सॅटेलाईट भाडे द्यावे लागणार आहे. हत्तीला बेशुद्ध करून मग त्याच्या मानेवर सॅटेलाईट कॉलर बसवावी लागते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button