ताज्या घडामोडीराष्ट्रिय

तापमानवाढीचे मोठे संकट; उत्तर-दक्षिण ध्रुवावर उष्णतेची लाट

लंडन |  जगासमोर आता तापमानवाढीचे मोठे संकट उभे राहिले आहे. हवामान बदलाचा परिणाम केवळ भारतातच नाही तर जगभराला बसत आहे. पृथ्वीच्या उत्तर-दक्षिण ध्रुवावरील परिस्थिती वेगळी नाही. ध्रुवांवरही हवामान बदलामुळे जगबुडीची भीती वाढली आहे. उत्तर-दक्षिण ध्रुवांवर एकाच वेळी उष्णतेची लाट दिसून येत आहे. त्यामुळे संशोधकांनी धोक्याचा इशारा दिला आहे.

अंटार्टिकामध्ये ३ हजार २३४ मीटर उंचीवर कॉन्कॉर्डिया स्थानक आहे. तिथे उणे १२ पूर्णांक २ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा हे तापमान ४० अंश सेल्सियस जास्त आहे. अंटार्टिकाच्या किनारपट्टीवर टेरा नोवा बेस येथे ७ अंश तापमान झाले आहे. हे फ्रिजिंग पॉइंटपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. मार्चमध्ये तिथे उणे तापमान असते, तर आर्क्टिकमधील वोस्तोक स्थानकात १७.७ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. सरासरीपेक्षा हे तापमान १५ अंश अधिक आहे. आर्क्टिक आणि अंटार्क्टिक येथे उष्णता वाढत आहे. पृथ्वीवरील हवामान संकट अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर पृथ्वीवरचा सर्वात मोठा बर्फाचा साठा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक तापमानवाढीमुळे तिथला बर्फ वितळत असल्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. दक्षिण आणि उत्तर ध्रुवांवर एकाचवेळी उष्णतेची लाट आली आहे, त्यामुळे संशोधकांनी धोक्याचा इशारा दिला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button