TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘छगन भुजबळ आणि वडेट्टीवारांची हकालपट्टी करा’; मराठा समन्वयक राज्यपालांकडे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक थेट राज्यपालांच्या दरबारात पोहोचले आहेत. मंत्र्यांकडून सुरू असलेल्या विविध वक्तव्यावरून आंदोलक आणि मंत्री असा वाद निर्माण झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची तक्रार केली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या 15 समन्वयकांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी छावा संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. या आंदोलकांनी राज्यपालांकडे आरक्षणाच्या अनुषंगाने विविध मागण्यांचे निवेदन दिलं आहे. तसेच भुजबळ आणि वडेट्टीवार यांचीही तक्रार केली आहे. हे दोन्ही नेते ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी मराठा समन्वयकांनी राज्यपालांकडे केली आहे.

हे दोन्ही नेते सातत्याने चुकीची विधाने करून दोन्ही समाजाची दिशाभूल करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button