महिलेच्या पोटातून काढले दीड किलो लोखंड
अहमदाबाद : पोटदुखीने त्रस्त असलेली एक महिला रुग्णालयात उपचारांसाठी आली. जेव्हा तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, तेव्हा तिच्या पोटातून दीड किलो वजनाच्या लोखंडाच्या काही वस्तू बाहेर काढण्यात आल्या.
संगीता असे संबंधित महिलेचे नाव असून, ती मानसिक रुग्ण आहे. तिला पोटदुखीच्या त्रास जाणवत होता. त्यामुळे तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या पोटातून दीड किलो वजनाच्या वस्तू बाहेर काढण्यात आल्या. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महिलेचे एक्स-रे काढल्यानंतर त्यामध्ये डॉक्टरांना पोटातील लोखंडाच्या वस्तू बाहेर काढल्या.
दरम्यान, या महिलेला एकुफेगिया हा मानसिक आजार आहे. हा आजार असलेला व्यक्ती अशा विचित्र वस्तू गिळतात. मात्र, अत्यंत दुर्मिळ असा हा आजार असल्याने याचे रुग्ण क्वचितच आढळतात, असे डॉ. परमार यांनी सांगितले.