breaking-newsआंतरराष्टीय

चीनमधील केमिकल प्लांटमध्ये भीषण स्फोट; २२ कर्मचारी ठार

चीनमध्ये एका केमिकल प्लांटमध्ये भीषण स्फोटात २२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच इतर २२ लोक जखमी झाल्याचे वृत्तसंस्था एएफपीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. उत्तर चीनमधील झांगजियाको शहरात ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

या स्फोटात आणखी काही लोक जखमी झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशामन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या असून स्फोटामुळे लागलेली आग विझवण्यात आली आहे.

या घटनेपूर्वी २४ नोव्हेंबर रोजीही चीनच्या ईशान्य भागातील जिलीन प्रांतात असाच एका वेअर हाऊसमध्ये भीषण स्फोट झाला होता. यामध्ये २ जण ठार झाले होते तर ५७ जण जखमी झाले होते. हा स्फोटही इतका भीषण होता की स्फोटानंतर ३७० घरांचे नुकसान झाले होते तर १५ घरं कोसळली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button