breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करा – विशाल वाकडकर

पिंपरी (महा ई न्यूज) – मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंग उडविण्यास सुरुवात होते. हे पतंग उडविण्यास चिनी नायलाॅन मांजा वापरला जातो. त्या मांजा विक्री करणा-यावर कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली. 
याबाबत पोलिस आयुक्त आर.के. पद्यनाभन आणि महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले. त्यांनी पत्रात म्हटले आहे की,  मकर संक्रांतीच्या काळात शहरभर अनेक ठिकाणी पतंग उडविले जातात. हे पतंग उडविण्यासाठी बंदी असलेला चिनी किंवा नायलॉनचा मांजा वापरला जातो. या मांज्यामुळे गळा कापून मागील वर्षी याच काळात डॉक्टर तरुणीचा नाशिक फाटा येते अपघात होऊन मृत्यू झाला होता. तसेच काळेवाडीत आणि पुण्यात काही तरुण व बालके चिनी मांजा कापल्यामुळे जखमी झाली होती. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शहरातील चायनिज व नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नूसार कडक कारवाईची मागणी केली आहे.
तसेच सक्रांतीच्या काळात देशात ठिकठिकाणी पतंग उडविण्याच्या स्पर्धा, महोत्सव आयोजित केले जातात. उत्साही युवक व आबाल वृध्द देखील यात भाग घेताना दिसतात. परंतू अनेक ठिकाणी बंदी असणारा चायनिज मांजा व नायलॉनचा मांजा वापरला जातो. या मांजामुळे शेकडो पक्षी जखमी होऊन मृत पावतात. तसेच शहरी भागात दुचाकी चालकांचे व पादचा-यांचे अपघात होतात. असे अपघात झाल्यानंतरच प्रशासन व पोलिस कारवाई करताना दिसतात. चायनिज व नायलॉनचा मांजा मानवी जीवितास व पर्यावरणास हानीकारक असल्यामुळे यावर उच्च न्यायालयाने बंदी घालावी अशी मागणी राष्ट्रीय हरित लवादाने केली होती. यास अनुसरुन सर्वोच्च न्यायालयाने 2017 पासून नायलॉन व चायनिज मांजावर बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पोलिस व प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी अशीही मागणी वाकडकर यांनी केली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button