breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आरोप-प्रत्यारोप : खासदार बारणे, आमदार जगताप यांच्यात जुंपली

  • आमदार जगताप यांच्या टिकेला बारणे यांचे प्रत्युत्तर

पिंपरी – सत्तेसाठी पक्षाचे झेंडे बदलणा-या जगतापांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. समाजवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मनसेचा सहारा असा प्रवास करीत भाजपवाशी झालेले जगतापांनी दुस-यांविषयी बोलू नये. अतिक्रमण आणि खाबूगिरीवर आम्ही केलेली टीका आमदार जगतापांना चांगलीच झोंबली आहे. माझ्या प्रश्नांना उत्तर द्यायचे सोडून त्यांनी वैयक्तीक टीका केली. लोकांशी निगडीत समस्यांवर बोलल्यानंतर जगतापांचा राग अनावर का झाला?, असा प्रश्न शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला. तसेच, थेरगावांविषयी कायमच आकस बाळगणा-यांना तेथील विकास दिसत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि. 23) आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याबरोबर बैठक घेऊन शहरातील अतिक्रमण, कचरा, पाण्याच्या समस्या मांडून आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हे प्रश्न सोडविण्यात प्रशासन आणि सत्ताधारी अपयशी ठरत असल्याची टीका केली होती. त्यावरून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्वरीत दुस-या दिवशी मूळ प्रश्नांना बगल देऊन स्वभावानुसार बारणे यांच्यावर टीका केली. त्याला आज सोमवारी (दि.27) खासदार बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सडेतोड उत्तर दिले.

 

खासदार बारणे म्हणाले की, मी सर्वसामान्य मानसांमध्ये मिसळतो. त्यामुळे नागरीकांनी केलेल्या तक्रारी, जनमानसाच्या समस्या लोकाप्रतीनिधी म्हणून अधिका-यांपुढे मांडणे माझे कर्तव्य आहे. त्यातून मी महापालिका आयुक्त व अधिका-यांसमवेत बैठक घेऊन शहरातील समस्या मांडल्या होत्या. राष्ट्रवादीची सत्ता घालवून भाजपला सत्ता राबवयाला दिली आहे. ती उबवायला नाही ? तुम्ही तर सत्तेचा बाजार चालवला असून भ्रष्टाचार आणि ‘खाबूगिरी’ यातच तुम्ही गुरफटले असल्याने शहरातील नागरिकांच्या समस्येचा विसर तुम्हाला पडलेला आहे. केवळ आकसापोटी टीका करण्यात तुम्ही धन्यता मानता या तुमच्या कार्यास आमच्या लाख लाख शुभेच्छा अशी परखड प्रतिक्रिया बारणे यांनी दिली होती.

 

बारणे म्हणाले, मी केंद्राच्या योजनासाठी काय पाठपुरावा केला हे भाजपच्या मंत्र्यांना विचारा तेच तुम्हाला सांगतील. विधानसभा सोडून महापालिकेच्या कारभारातच रमण्यात अधिक धन्यता तुम्ही मानत असल्याने तुम्हांला शहरवासियांच्या व्यथा काय कळणार? निवडणुकांना मी घाबरत नाही. मी माझ्या कामाच्या जोरावर व लोकसंपर्काच्या बळावर येणा-या लोकसभेला उभा राहणार आहे. त्यामुळे निवडणुकीत खोटी आश्वासने व गाजर दाखवून निवडणुका मी लढवल्या नाहीत. माझ्या कर्तुत्वाच्या जोरावर मतदारांच्या आशीर्वादाने मी 2019  ला पुन्हा खासदार होणार आहे. त्यामुळे मला निवडणुकीची चिंता नाही. त्याची काळजी जगताप यांनी करू नये, असा उपरोधीत सल्लाही बारणे यांनी दिला आहे.

 

गेल्या दिड वर्षात शहरातील प्रश्नांबाबत आलेले अपयश, भ्रष्टाचाराचे होणारे आरोप, नियोजन शुन्य कारभार, हप्ते वसूली, शहराच्या रस्त्यांवर आलेले बकाल पणाचे स्वरूप, ठेकेदारांना हाताशी धरून संगनमताने भरल्या जाणा-या निविदा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर आरोप करून सत्ता मिळवूनही एकही आरोप सिद्ध करता आला नाही. यामुळे मानसीक संतुलन बिघडल्याने व रोज होत असलेल्या आरोपाने बेजार झालेल्या जगतापांनी मुळ प्रश्नांपासून लक्ष विचलीत करण्यासाठी जुनाच फंडा अवलंबला असून ते व्यक्तीगत आरोप करीत आहेत, अशा शब्दांत बारणे यांनी जगतापांवर तोफ डागली आहे. आता

 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोप नित्याचेच

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यात आमदार लक्ष्मण जगताप यांचे श्रेय पनाला लागले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार थोपविण्यासाठी लोकांचे प्रश्न घेऊन शहराच्या विकासाची दुरदृष्टी ठेवणारे जगताप यांनी सत्तापालट केली. शहराची एकहाती सत्ता हाकत असताना त्यांनी केवळ चिंचवड विधानसभा मतदार संघाचा विचार न करता संपूर्ण शहराचा विचार केला आहे. आजही मोठे प्रकल्प राबविताना त्यांनी समाविष्ट भागाला प्रथम प्राधान्य दिले आहे. असंख्य कामे झालेली असताना लोकसभेची निवडणूक आल्यानंतर खासदार बारणे आणि आमदार जगताप यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असतात. सध्या सुरू असलेली त्यांच्यातील चिखलफेक त्याचे उत्तम उदाहरण असून यात जनतेची दिशाभूल होत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button