breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘भाजपाचं सरकार आल्यास सगळ्यांना रामलल्लाचं दर्शन घडवणार’; आणखी एका भाजपा नेत्याचं विधान

Telangana Election 2023 : आमची सत्ता आल्यास आम्ही मध्य प्रदेशातल्या सगळ्यांना मोफत रामल्लाचं दर्शन घडवू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. दरम्यान, आणखी एका भाजपा नेत्यानं असंच वक्तव्य केलं आहे.

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा म्हणाले, जर तेलंगणात भाजपाचं सरकार आलं तर आम्ही सगळ्यांना रामाचं दर्शन घडवू. आम्हाला कुठलाही फायदा नको आहे. आम्ही सगळ्यांना राम मंदिराचं दर्शन घडवू. त्यांचं हे वक्तव्य चांगलच चर्चेत आहे.

हेही वाचा – ‘..तर आम्ही २१ लाख देऊ’; बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना अंनिसचं खुलं आव्हान 

अमित शाह नेमकं काय म्हणाले होते?

तुम्ही ३ डिसेंबरला भाजपचे सरकार आणा, तुम्हाला रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजप सरकार करेल, असं अमित शाह म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button