breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीमध्ये ३७ हजारांचा गुटखा जप्त

पिंपरी –  विक्रीसाठी घेऊन जात असलेला 37 हजारांचा गुटखा पोलिसांनी सापळा रचून पकडला. ही कारवाई चिखली पोलिसांनी गुरुवारी (दि. 29) दुपारी बाराच्या सुमारास स्पाईन रोड येथे केली. रिजा अहमदसाहेब जाद चौधरी (22, रा. काळभोर नगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी स्वाती दामोदर मस्के (वय 21) यांनी  चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस स्पाईन रोडने परिसरात गस्त घालत असताना त्यांना एक टेम्पो (एम एच 14/इ.एम 5897) भरधाव वेगात जाताना दिसून आला. पोलिसांनी संशयावरून टेम्पो अडवून तपासणी केली असता त्यांना भाजीपाल्याच्या पोत्यात गुटखा ठेवल्याचे निदर्शनास आले.
पुढील चौकशीत गुटखा विक्रीसाठी नेत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून 37 हजारांचा गुटखा आणि टेम्पो असा एकूण 1 लाख 37 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button