breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटासंबंधी नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना पत्र, विनंती करत म्हणाले…

मुंबई |

सध्या सगळीकडेच दिग्दर्शक अग्निहोत्री यांचा द काश्मिर फाइल्स हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाला पंजाब सरकार, हरियाणा सरकार आणि मध्य प्रदेशमध्ये टॅक्स फ्री केले आहे. आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करा अशी मागणी केली आहे. भाजपा आमदार राणे यांनी ट्वीट केलं आहे. हे ट्वीट करत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हणाले, “जम्मु काश्मीरमध्ये मुस्लीम दहशवादाला बळी पडलेल्या हिंदुंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त करावा”, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी हा चित्रपट करमुक्त केल्यास, मुस्लीम दहशतवाद्यांनी जम्मु काश्मीर येथील हिंदु समाजावर अत्याचार केल्याचे खरे चित्रीकरण देशातल्या जनतेला पाहता येईल. हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेला लवकर पाहता यावा यासाठी करमुक्त करावा ही विनंती, असे आवाहन त्यांनी केलं आहे.

https://www.instagram.com/reel/CbAvqqmFu-G/?utm_source=ig_embed&ig_rid=35908c8f-08ca-456a-af13-5bfe0d24bfe4

दरम्यान, हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. तर या चित्रपटाचा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याआधीही गुजरात आणि हरियाणा येथे हा चित्रपट करमुक्त केला आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवरून उत्तर प्रदेशमधील नागरिक इंतेझार हुसैन सय्यद यांनी याचिका केली आहे. चित्रपटात मुस्लिम आणि हिंदू समाजामध्ये अशांतता निर्माण होऊ शकते, तसेच यामुळे दोन्ही धर्मियांच्या भावना दुखावू शकतात आणि हिंसाचार होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठाने यावर तातडीने मंगळवारी सुनावणी निश्चित केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button