breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

चिखलीतील गोदामाला आग लावली कि लागली? ; भंगार दुकाने हटविण्यामागे आर्थिक गणिते असल्याची चर्चा

वडाचा मळ्यातील भंगार गोदामाची आग सहा तासानंतर आटोक्यात

पिंपरी ( महा ई न्युज ) – चिखलीतील वडाचा मळ्यातील भंगाराच्या गोदामाला रात्री नऊच्या सुमारास लागलेली आग सहा तासानंतर आटोक्यात आली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी पिंपरी फायर स्टेशनच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, भंगार दुकाने हटविण्यामागे काही जणांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असून भंगार दुकानांना आग लावली कि लागली, यावरुन दुकानदारांमध्ये संशयाचे वातावरण पसरले आहे. 

अग्निशामक विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुदळवाडी येथील वडाचा मळा परिसरात असलेल्या भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची वर्दी रविवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार पिंपरी अग्निशामक मुख्यालय आणि चिखली उपकेंद्र येथून प्रत्येकी एक असे दोन बंब घटनास्थळी रवाना झाले. मात्र आगीचे स्वरूप पाहता भोसरी, पिंपरी, प्राधिकरण आणि तळवडे येथील उपकेंद्राचे प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे चाकण एमआयडीसी, पुणे महापालिका तसेच खासगी कंपन्यांचे अग्निशामक बंबही मदतीसाठी बोलविण्यात आले. याशिवाय पाण्याची वाहतूक करण्यासाठी खासगी टँकरचीही मदत घेण्यात आली. तब्बल सहा तासानंतर ही आग आटोक्यात आली.

 

सदरील घटनास्थळाला महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. सध्या घटनास्थळी कुलींगचे काम सुरू असल्याचे अग्निशामक दलाच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान,  चिखली, कुदळवाडीत आगीच्या घटना वारंवार होवू लागल्या आहेत. याबाबत महापालिकेने यापुर्वीच तेथील भंगार दुकान मालकांना नोटीस बजाविल्या आहेत. तसेच अनधिकृत भंगाराचे शेडवर कारवाई देखील सुरु आहे. परंतू, चिखली, कुदळवाडी, जाधववाडी परिसरातील भंगार व्यावसायिकामुळे परिसराचा विकास खुंटला आहे. त्या ठिकाणी रहिवाशी झोन असूनही घरे विकत घेण्यास नागरिक जात नाहीत. त्यामुळे भंगार दुकाने हटविण्यामागे आर्थिक गणिते असल्याची चर्चा सुरु आहे.  चिखली, कुदळवाडी परिसरात टोलेजंग टाॅवर उभारणी करण्यासाठी तेथील भंगार व्यावसायिकांना हटविल्याशिवाय स्थानिक जमिनीना सोन्याचा भाव येणार नाही. त्यामुळे भंगार दुकानांना वारंवार लागणा-या आगीच्या घटना संशयास्पद असल्याचेही चर्चा काही जाणकाराकडून व्यक्त होत आहेत. 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button