breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये 70 झाडांची कत्तल

पिंपरी – चिंचवड गावातून बिजलीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एबीसी हौसिंग सोसायटी आवारात असणा-या ७० अशोका जातीच्या झाडांची कत्तल करण्यात आली. इतक्या मोठया प्रमाणात झाडांची कत्तल झाल्याने शहरातील पर्यावरण प्रेमी व नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

एकीकडे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शहरात विविध उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे अशा प्रकारे झाडांची खुले आम कत्तल होत आहे. ही बाब गंभीर आहे. येथील सोसायटी आवारात असणारी मोठी झाडे तोडण्यात आली आहेत. ही झाडे जास्त उंचीची झाल्याने त्याची छाटणी करणे गरजेचे होते. पावसाळ्यात ही झाडे वा-याने वाकली जातात. मात्र येथील झाडांची बुंध्यातून छाटण्यात आल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

सोसायटी आवारातील ही झाडे पादचा-यांना त्रासदायक ठरत असल्याने कापण्यात आल्याचे येथील वृक्षतोड कर्मचारी सांगत आहेत. मात्र ही छाटणी करण्यासाठी महापालिक प्रशासनाची परवानगी घेतली का? याबाबत ते मूग गिळून गप्प बसत आहेत. यामुळे येथील वृक्षतोड कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
धोकादायक झाडांची छाटणी अथवा संपूर्ण झाड तोडण्यासाठी महापालिका प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, चिंचवडमधील हा प्रकार पाहता येथील वृक्षतोड ही गंभीर बाब आहे. संबंधित झाडांच्या छाटणीबाबत येथील रहिवाशांना विचारले असता आम्हाला याबाबत माहीत नसल्याची उत्तरे स्थानिक नागरिक देत आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी शहरातील पर्यवरणप्रेमी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button