breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

चिंचवडमधून शिवसेनेचा ढाण्या वाघ मैदानात, ‘भाऊ-दादा’च्या थेट लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष

पिंपरी |महाईन्यूज|

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक राहूल कलाटे हे अपक्ष मैदानात उतरले आहेत. यामुळे चिंचवडचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप व राहूल कलाटे यांची थेट सामना होणार आहे. या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले असून आखाड्यात कोण मैदान मारणार..? हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळेचा अर्ज अवैध ठरल्याने महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करुनही कलाटे यांची बंडखोरी थोपवण्यास अपयश आले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे शहराध्यक्ष तथा विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांना बिनविरोध निवड व्हावी, याकरिता महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरुन ब-याच नाट्यमय घडामोडी घडल्या. कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून मातोश्रीवरुनही प्रयत्न झाले. मात्र, ते प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आज (सोमवार) शेवटच्या दिवशी देखील कलाटे यांनी अर्ज माघारी न घेतल्याने चिंचवडमधून जगताप-कलाटे यांच्यात खरा सामना रंगणार आहे

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून कैलास परदेशी, जावेद शेख, धर्मपाल तंतरपाळे या तिघांनी उमेदवारी अर्ज माघार घेतले. तर एकूण 11 उमेदवार रिंगणार उभे आहेत. यामध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे लक्ष्मण जगताप (कमळ), बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लोंढे (हत्ती), जनहित लोकशाही पार्टीचे नितीश लोखंडे (रिक्षा), बहुजन मुक्ती पार्टीचे एकनाथ जगताप (खाट), भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महावीर संचेती (शिट्टी), भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या छायावती चंद्रकांत देसले (हातगाडी) यांच्यासह राहूल कलाटे (बॅट), सुरज खंडारे,(संगणक), डॉ. मिलींदराजे भोसले (हेलिकाॅप्टर), राजेंद्र काटे (कपबशी), रवींद्र पारधे न(नारळाची बाग) हे उमेदवार रिंगणात आहेत.

राज्यात भाजप-शिवसेना व मित्र पक्षांची महायुती असताना शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्याने चिंचवड विधानसभेचा आखाडा चांगलाच तापणार आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने बाद झाला. यामुळे राष्ट्रवादीने राहुल कलाटे यांना पुरस्कृत घोषित केल्यास जगताप यांच्यापुढे आव्हान निर्माण होणार आहे.

दरम्यान, २००९ मध्ये अपक्ष रिंगणात उतरलेले लक्ष्मण जगताप यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला होता. त्यांनतर २०१४ मध्ये चारही प्रमुख पक्षांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवले. त्यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांना १,२३,७८६ एवढे भरघोष मतदान करून पुन्हा संधी दिली. तर दुसऱ्यास्थानी असलेले शिवसेनेचे राहुल कलाटे यांना ६३,४८९ तर राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी ४२,५५३ मतदारांनी पसंती दर्शवली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button