breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चापेकर चौक ते गेट वे ऑफ इंडिया सायकल रॅली काढून शहिदांना वाहिली श्रध्दांजली

पिंपरी / महाईन्यूज

मुंबईतील हॉटेल ताजवर झालेला २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिंचवड येथील चापेकर चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत सायकल रॅली काढून ४० युवकांनी अनोख्या प्रकारे श्रध्दांजली वाहिली.

चिंचवड येथील इको पेडलर्स ग्रुपच्या वतीने बाबा भोईर यांनी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. बारा वर्षाच्या मुला-मुलींपासून ते ६५ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. विशेष बाब म्हणजे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या सायकल रॅलीत सहभाग घेऊन
लोणावळ्यापर्यंत सर्वांना साथ दिली.

बुधवारी (ता. २५) रात्री अकरा वाजता चिंचवडगावातील चापेकर चौकात खासदार श्रीरंग बारणे यांनी हिरवा झेंडा फडकाविल्यानंतर या रॅलीस सुरुवात झाली. गुरुवारी (ता. २६) सकाळी आठ वाजता ४० सायकलस्वारांचे पथक १५० किलोमीटर अंतर पार करून गेट वे ऑफ इंडियाला पोहोचले. तेथील स्मृती स्थळाला सर्वांनी फुले वाहून शहिदांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली
वाहिली. या सायकलवीरांमध्ये माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे बंधू किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील यांच्यासह अकलुजचे सहा जण, चिंचवड येथील बारा वर्षाची दुर्गा मिरजकर तर ६५ वर्षाचे पांडुरंग म्हस्के यांनी उत्साहाने भाग घेतला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button