breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणे

चाकणजवळ 17 वर्षीय तरुणीची निघृण हत्या

पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण जवळील भामा-आसखेड धरण परिसरात, एका 17 वर्षीय तरुणीची निघृण हत्या करण्यात आली आहे. पीडितेचा मृतदेह विवस्त्रावस्थेत आढळला आहे. काल उशिरा ही घटना घडकीस आली.

भामा-आसखेड परिसरात करंजविहिरे इथे 17 वर्षीय तरुणीची डोक्यात दगड घालून निघृण हत्या करण्यात आली. मृतदेह विवस्त्रावस्थेत झाडांमध्ये टाकण्यात आला होता. त्यामुळे या पीडित मुलीवर अतिप्रसंग करुन निघृण हत्या केल्याचा नातेवाईकांचा संशय आहे. नातेवाईकांनी याप्रकरणी चाकण पोलिसात तक्रार दाखल करुन, तिथेच ठाण मांडलं.

त्यामुळे पोलीस स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नराधम आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली.

याप्रकरणी तरुणीच्या हत्येच्या घटनेत काही संशयितांना चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील योग्य तो गुन्हा दाखल करण्यात येईल असे चाकण पोलिसांकडून सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button