breaking-newsराष्ट्रिय

‘चांद्रयान-२’चं प्रक्षेपण प्रत्यक्षात पाहण्याची संधी, जाणून घ्या कशी कराल नाव नोंदणी

भारताचा महत्वकांशी प्रकल्प असणारे चांद्रयान-२ लवकरच आकाशात झेपावण्यास तयार आहे. लाँचिंगसाठी तयार आहे. १५ जुलै रोजी रात्री २ वाजून ५१ मिनिटांनी ‘चांद्रयान-२’ चं आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरीकोटामधून येथून प्रक्षेपण होणार आहे. इस्त्रोमार्फत करण्यात येणाऱ्या या लॉचिंगचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे लॉचिंग सर्वसामन्यांना श्रीहरीकोटा येथून प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.

‘चांद्रयान-२’ चं लॉचिंग पाहण्यासाठी आज रात्री १२ वाजल्यापासून म्हणजेच ४ जून सुरु होताच नावनोंदणी सुरु होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी इस्त्रोकडून कोणत्याही पद्धतीचं शुल्क किंवा तिकीट आकारण्यात येणार नाही. श्रीहरीकोट्टा येथील दोन लॉचिंग पॅडपैकी एकावरुन हे प्रक्षेपण होणार आहे. याच लॉचिंग पॅडपासून काही अंतरावर असलेल्या मैदानासारख्या रॉकेट स्पेस थीम पार्कमधून हे लॉचिंग साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. इस्त्रोच्या ट्विटवर हॅण्डलवरुन यासंदर्भात ट्विट करण्यात आले आहे.

ISRO

@isro

🇮🇳 🇮🇳
Online registration process for witnessing the forthcoming GSLV MKIII-M1 / Chandrayaan-2 mission will commence @ 00:00 hrs on July 4th 2019

1,013 people are talking about this

चंद्रावरच्या खनिजांचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान-२ मोहीम आखण्यात आली आहे. चंद्राच्या ज्या भूभागावर आत्तापर्यंत कोणीही संशोधन केले नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ संशोधन करणार आहे. लाँचिंगनंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. चंद्राच्या कक्षात शिरल्यानंतर यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या आसपास ठरलेल्या जागी उतरणार आहे.

कशी कराल नोंदणी

हे प्रक्षेपण पाहण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. इस्त्रोमार्फत सतीश धवन स्पेस सेंटरच्या (एडीएससी) वेबसाईटवर ४ जूलैपासून उपलब्ध होणार आहे.

त्या लिंकवर क्लिक करुन तेथे आपली माहिती देऊन लॉगइन करणे आवश्यक असणार आहे.

याआधी इस्त्रोचे लॉचिंग पाहण्यासाठी नागरिकांना त्यांचे इमेल आयडी इस्त्रोकडे पाठवायला लागायचे. हे इमेल आयडी व्हेरिफाय झाल्यानंतरच लॉचिंग लाइव्ह पाहता येत होते.

हे लॉचिंग पाहायला जाण्यासाठी नोंदणी करताना नाव, संस्थेचे नाव, किती जणांचा ग्रुप आहे, लॉचिंग पॅडजवळ कसे पोहचणार, कोणत्या गाडीने येणार तिचा नंबर अशी माहिती द्यावी लागणार आहे.

या साईटवर मोबाइल क्रमांकही द्यावा लागणार आहे. त्या माध्यमातून व्हेरिफिकेश झाल्यानंतर अटी आणि नियम मान्य केल्यावर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button