breaking-newsटेक -तंत्रमुंबई

प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचे विशेष डुडल

मुंबई |महाईन्यूज|

भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘गुगल’ ने खास डुडल बनवलं आहे. या विशेष डुडलमधून गुगलने भारताच्या विविध कला आणि संस्कृतीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील महत्वाचे सण उत्सव तसेच विशेष व्यक्तींवर गुगलकडून खास डुडल तयार करून त्यांचे महत्व अधोरेखित केले जाते.

आज देशभरात ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्यानिमित्त गुगलने डुडल तयार केले आहे. या डुडलमधून कला आणि संस्कृतीचा मिलाप आहे. यात ऐतिहासिक ताजमहाल आणि इंडियागेट यांच्यासह विविध राज्यामधील संस्कृतीची झलक पाहायला मिळते. उत्तरेपासून दक्षिण भारतातील विविध कलांचा संगम या डुडलमध्ये करण्यात आला आहे. देशातील पर्यटन, संगीत कलेचा वारसा, सण उत्सव, शेतीचे महत्व या डुडलमध्ये ठळकपणे दाखवण्यात आले आहे. सिंगापूरमधील आर्टिस्ट मेरू सेठ यांनी आजचे प्रजासत्ताक दिन विशेष डुडल डिझाइन केले आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला ब्राझीलचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे आहेत. दिल्लीतील प्रसिद्ध इंडिया गेट येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनात भारताच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन देशवासियांना घडणार आहे. जवळपास ९० मिनिटं ही परेड होणार असून यात तिन्ही दलाचे सामर्थ्य, कला आणि विविध राज्यांचे चित्ररथ आपली झलक दाखवतील. यंदा महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या चित्ररथाला केंद्र सरकारने परवानगी नाकारली होती.

सात दशकांपूर्वी देशात संविधान लागू झाले होते. स्वातंत्रपूर्वकाळात १९३० ते १९४७ या काळात २६ जानेवारी हा दिवस पूर्ण स्वराज्य दिवस म्हणून साजरा केला जात असे. स्वतंत्र भारताचे संविधान २६ जानेवारी १९४९ रोजी पूर्ण झाले. त्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button