breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमित शाह यांच्या कार्यक्रमात महिलांशी गैरवर्तन, अंतर्वस्त्रेही तपासल्याचा आरोप

छत्तीसगड – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची एक जनसभा वादात अडकण्याची शक्यता आहे. बेटी बचावचा नारा देणाऱ्या भाजपा अध्यक्षांच्या एका रॅली दरम्यान सुरक्षेच्या नावाखाली महिला आणि तरुणींचे अंतर्वस्त्रेही तपासण्यात आली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. रॅलीमध्ये शाह यांना काळे झेंडे दाखवण्यात येऊ नयेत म्हणून कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या महिला व तरुणींची अंतर्वस्त्रेही तपासण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. सुरक्षेच्या नावाखाली त्यांनी परिधान केलेले कपडेही उतरवण्यात आले आणि त्यांची अंतर्वस्त्रेही तपासण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

छत्तीसगडच्या चरौदा येथे आयोजित महिला महासंमेलनात सहभागी होण्यासाठी अमित शाह छत्तीसगडच्या एक दिवसीय दौऱ्यावर होते. कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या व काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेल्या महिला व तरुणींची अंतर्वस्त्रेही तपासण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. रॅलीमध्ये शाह यांना काळे झेंडे दाखवण्यात येऊ नयेत म्हणून हे सगळं करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर छत्तीसगड काँग्रेसच्या नेत्या किरणमयी नायक

तपासणीसाठी आतापर्यंत तरुणांचे मोजे आणि पट्टे उतरवले जात होते. पण या घटनेमुळे महिला सुरक्षेच्या मोठमोठ्या बाता मारणाऱ्या भाजपा सरकारची हीन दर्जाची मानसिकता उघड झाली आहे. भाजपाचे नेते आणि मंत्री बलात्काऱ्याला संरक्षण देतात, त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवून उपयोग नाही. बेटी बढाव, बेटी पढावच्या जागी भाजपावाल्यांपासून मुलींना वाचवा, असे नारे आता सुरू झाले आहेत, अशी बोचरी टीका छत्तीसगड काँग्रेसच्या नेत्या किरणमयी नायक यांनी केली आहे. कॉंग्रेसशिवाय ‘आप’नेही या घटनेवर जोरदार टीका केली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button