breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या २ तरुणांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

चंद्रपूर – चंद्रपुरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन तरुणांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील आरमोरी मुख्य महामार्गावरील ही घटना आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून तरुण मुलांचा असा अकाली मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रशांत सहारे (22) आणि रोहित चट्टे (22) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

प्रशांत आणि रोहित हे दोघेही खरकाडा येथील रहिवासी आहेत. कोरोनाच्या काळात घराबाहेर न पडता आल्याने सध्या दोघे दररोज मॉर्निंग वॉकला जायचे. मात्र आजचा मॉर्निंग वॉक त्यांच्यासाठी अखेरचा ठरला. दोघांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या भीषण धडकेत दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताबाबत स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी तरुणांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, अपघाताची माहिती कुटुंबियांना कळताच त्यांना मोठा धक्का बसला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button