breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चंद्रकांत पाटलांना पालकमंत्री पद म्हणजे पुण्यातील मतदारांचा अपमान

पिंपरी, (महाईन्यूज) – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची पुणे जिल्हा पालकमंत्री पदी नियुक्ती करून राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील मतदारांचा अपमान केल्याची टिका माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.

यासंदर्भात भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे शहरात आठ आमदार, पिंपरी चिंचवड शहरात तीन तर जिल्ह्यात १५ आमदार भाजप सेना युतीचे निवडून आले आहेत. महापालिका सार्वत्रिक निवडणूकीत पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तांतर घडवा. पिंपरी चिंचवड शहराला मंत्रीमंडळात संधी देतो. असे सुतोवाच केले होते. त्यावर स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादीचा पाडावा करुन ७७ नगरसेवक कमळ चिन्हांवर निवडूण आणून भाजपाला एकहाती सत्ता मिळून दिली.

सन २०१४ विधानसभा निवडणूकीपासून शहराला मंत्रीमंडळात स्थान मिळेल. ही भाजपा आमदार व शहरवासींयाची अपेक्षा आहे. मात्र, विधी मंडळाचा कार्यकाल संपत आला, तरी मंत्री पदाबाबत पाटी कोरीच राहिली आहे. उलट पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती केली. या पदासाठी पुणे जिल्ह्यातील १५ पैकी एकही आमदार लायक वाटला नाही. हा सरळ सरळ पुणे जिल्ह्यातील मतदारांचाच अपमान आहे, अशी टिका भापकर यांनी निवेदनातून केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button