breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकाची फसवणूक करणा-या ‘मार्व्हल बिल्डर’वर गुन्हा दाखल

पिंपरी, (महाईन्यूज) – तब्बल तीन कोटी रुपये घेऊन घराचा ताबा न देता लोकांची फसवणूक करणा-या मार्व्हल ओमेगा बिल्डर्स प्रा. लि.चे संचालक विश्वजीत सुभाष झंवर आणि महेश बन्सीलाल लड्डा यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बावधन खुर्द येथील मार्व्हल सेल्व्हा रिज इस्टेट प्रकल्पात घर घेणा-या लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी घर घेणारे नागरिक रणजीत हेमचंद्र ओक (वय 46, रा. अभीमान श्री सोसायटी, पाषाण रोड, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. बिल्डरांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे समाजात हक्काचे घर घेण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजणा-या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्व्हल ओमेगा बिल्डर्स प्रा. लि. कंपनीचा बावधन खुर्द येथील मिळकतीवर मार्व्हल सेल्व्हा रिज इस्टेट नावाचा प्रकल्प सुरू आहे. रणजीत ओक यांनी प्रकल्पातील बी/702 मध्ये 432.05 स्क्वेअर मीटर फ्लॅट 2013 मध्ये बुक केला. त्यापोटी बिल्डरला 2 कोटी 29 लाख 84 हजार 200 रुपये  मोजावे लागले. सगळे पैसे देऊन सुध्दा बिल्डरने हा प्रकल्प विहत मुदतीत पूर्ण केला नाही. घरासाठी म्हणून दिलेली रक्कम बिल्डरने घर बांधण्यासाठी नाही तर अन्य दुस-या कामासाठी वापरल्याचा संशय तक्रारदार व्यक्तीने वर्तविली आहे. फ्लॅटचे हस्तांतरण न करता माझी फसवणूक केल्याचा आरोप ओक यांनी केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button