breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गुन्हेगारी ओळख लपवण्यासाठी चोरट्याकडून बनावट आधार कार्डचा वापर

गुन्हे शाखेच्या युनिट एक पथकाने ठोकल्या बेड्या, चोरट्याकडून साडेआठ लाखाचा ऐवज जप्त

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

अट्टल सोनसाखळी चोरट्याने स्वताःची गुन्हेगारी ओळख लपविण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार केल्याचे धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवडसह पुणे शहर परिसरात त्याने दहा गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. त्या चोरट्याकडून तब्बल 8 लाख 48 हजार 800 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली.

समीर श्रीकांत नान्नजकर (वय 46, रा. खंडोबा मंदीर जवळ, भोसरी), असे अटक केलेल्या आरोपीचे मुळ नाव आहे. तर गुन्हेगारी ओळख आणि पोलिसापासून लपण्यासाठी आपले स्वताःचे नाव तो बदलून राहात होता. त्याने विनायक श्रीकांत मान्नजकर या नावाने नवीन आधार कार्ड तयार केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

याबाबत सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत असताना रोषण गार्डन, भोसरी येथे सापळा लावून आरोपी समीर याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने 2017 पासून दहा ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आठ लाख 48 हजार 800 रूपयांचे 231 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

आरोपी समीर याने त्याच्या साथीदारासह भोसरीमध्ये तीन, भोसरी एमआयडीसीमध्ये पाच आणि हिंजवडीमध्ये दोन ठिकाणी चोरी केली आहे. तीन पोलीस ठाण्यातील एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. समीर याच्यावर निगडी, डेक्कन, लोणी काळभोर, एमआयडीसी लातूर, हडपसर पोलीस ठाण्यात वाहन चोरी आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याचे आठ गुन्हे दाखल आहेत. तो दोन वेळा वाताहत कारागृहात होता.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त आर. आर. पाटील, श्रीधर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सपोफौ रविंद्र राठोड, रविंद्र गावंडे, पोलीस कर्मचारी आप्पा लांडे, बाळु कोकाटे, अमित गायकवाड, मनोजकुमार कमले, अंजनराव सोडगिर, मारूती जायभाये, सचिन मोरे, प्रविण पाटील, विजय मोरे, प्रमोद गर्जे, विशाल भोईर, गणेश सावंत व तानाजी पानसरे यांच्या पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button