breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

घाटकोपरमधून बेपत्ता झालेल्या मुलींची आमदार राम कदमांकडे चाैकशी करा

मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे संस्थेची मागणी 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  घाटकोपर विधानसभा मतदार संघात यापुर्वी जेवढ्या मुली, महिला हरविल्या आहेत. त्या मुली, महिलांची पोलिस ठाण्यात नोंदी आहेत. त्यासंदर्भात भाजप आमदार राम कदम यांची चाैकशी करावी, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस निरीक्षक शिंदे यांच्याकडे तक्रार दिली आहे.  यावेळी  मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अभिषेक हरीदास, अध्यक्ष विकास कुचेकर,  संचालक आण्णा जोंगदंड,  महाराष्ट्र अध्यक्ष सतिश लालबिगे, मुरलीधर दळवी उपस्थित होते.

त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भाजप प्रवक्ते आणि आमदार  राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी जमावासमोर जर एकाद्या मुलाने मुलीला प्रोपोज केला आणि त्या मुलीने नकार दिला तर त्या मुलीला पळून आणुन मुलाच्या ताब्यात देणार असे वक्तव्य केले. हे वक्तव्य हे कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. कलम 363 प्रमाणे अपहरण सारख्या गून्हा जाहीरपणे करुन संबंधित मुलाला एक प्रकारे मदत करणारा आहे. तसेच महिलांचा विनयभंग करणारा आहे.  कायदे मंडळाचे सदस्य असलेले आमदार राम कदम म्हणजे महिलांचे “रक्षक झाले भक्षक”असे  म्हणण्याची वेळ आली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृती समितीने केली आहे.

भाजपाने देशभर बेटी पढाआे, बेटी बचाव सारखा अभियान हाती घेतले आहे. त्यावर करोडो रुपये शासन खर्च करत जनजागृती करीत आहे. पण, अशा वक्तव्यामुळे देशातील 125 करोड जनता भारतीय जनता पार्टीवर नाराज झाली आहे. तसेच महाराष्ट्र पोलिसांनी हरवलेल्या मुली संदर्भात दिलेल्या अवहालात ३००० मुली बेपत्ता झालेल्याच्या तक्रारी आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button