breaking-newsपुणे

घरगुती भांडणातून पत्नीकडून पतीचा खून; महिला स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर

पुणे |महाईन्यूज|

घरगुती भांडणातून एका महिलेनं आपल्या पतीचा कोयत्यानं गळा कापून खून केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रोड परिसरातील नऱ्हे भागात घडली आहे. पतीच्या हत्येनंतर आरोपी महिला स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाली. सिंहगड पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज पहाटे साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. महंतेश बिराजदार (वय २७) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर, जयश्री (वय २५ – बदललेलं नाव) असं आरोपी महिलेचं नाव आहे. जयश्री व महंतेश यांच्यात लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते. मात्र, लग्नाआधी काही दिवस महंतेश गावी निघून गेला होता. तो आपल्याला फसवत असल्याचा ग्रह जयश्रीनं करून घेतला. त्यातून तिनं महंतेशविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्यानं जयश्रीशी लग्न केलं. मात्र, लग्नानंतरही त्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं. महंतेश नेहमी दारू पिऊन येत असल्यानं त्याचा जयश्रीशी वाद व्हायचा. आज पहाटेही त्यांच्यात असाच वाद झाला. त्यावेळी संताप अनावर झालेल्या जयश्रीनं घरातील कोयत्यानं नवऱ्याच्या गळ्यावर सपासप वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

पतीचा खून केल्यानंतर जयश्रीनं आपल्या वडिलांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला आणि आपण स्वत:ही आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. मात्र, तिच्या वडिलांनी तिला समजावून पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितलं. त्यानंतर ती पोलिसांकडं हजर झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button