breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारण्याचा प्रस्ताव स्थगित करा – नगरसेवक नाना काटे

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पाच हजार चौरस मीटर जागेहून अधिक क्षेत्रात बांधण्यात आलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील फ्लॅटधारकाकंडून प्रति महिना १०० रुपये घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेला प्रस्ताव स्थगित करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात नगरसेवक नाना काटे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महापालिकेने शहरातील पाच हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या पुढील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांमधील फ्लॅटधारकांना घनकचरा व्यवस्थापन शुल्काच्या नावाखाली प्रति फ्लॅट प्रति महिना सरासरी शंभर रुपये आकारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६ व राज्य सरकारचा घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१७ या अंतर्गत कचरा निर्मिती करणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती यांना आपल्या जागेतच ओला व सुका कचरा विलगीकरण करणे सक्तीचे आहे. त्याचबरोबर ओल्या कचऱ्यावर प्रकल्प उभारणे हे मोठ्या गृहप्रकल्पांना सक्तीचे आहे. या नियमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोणत्याही प्रकारची सकारात्मक चर्चा शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांसोबत केलेली नाही.

त्यामुळे यासंदर्भात महापालिकेने शहरातील नागरिकांना मार्गदर्शक ठरेल असा उपविधी मसुदा तयार करावा. ज्या सोसायट्यांना महापालिकेने यासंदर्भात तीन महिन्यांपूर्वी नोटीस दिली व ज्या सोसायट्या कचरा व्यवस्थापन यंत्रणा का उभारू शकल्या नाहीत, यासंदर्भात त्यांच्या अडचणी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करावी. ओला व सुका कचरा विलीगीकरण करताना तो कचरा साठवणूक करण्यासाठी महापालिकेने पायाभूत सुविधांची उपलब्धता (कचरा संकलन व्यवस्था उपलब्ध करणे) साठवणूक साहित्याची सोय करून द्यावी. ज्या सोसायट्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा करू इच्छितात. त्यांना यासंदर्भात स्वतंत्र मार्गदर्शन आणि काही प्रमाणात आर्थिक सहकार्य करण्यात यावे. तोपर्यंत घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारण्याचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button