breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

घड्याळावरुन लोकेशन ट्रॅकिंग, सकाळी 6 वाजता धडक, 9 कामचुकार कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा दणका

नागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या कामाच्या टाळाटाळीची चर्चा नेहमीच होत असते. सामान्य नागरिक नेहमीच या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी करत असतात. मात्र, यंत्रणांच्या ठिम्मपणापुढे नागरिकही निराश होऊन हार मानतात. मात्र, राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये याच कामचुकार कर्मचाऱ्यांना शेराला सव्वाशेर मिळाल्याची प्रचिती मिळालेली आहे. नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अशा कामचुकार कर्मचाऱ्यांचं चतुराईने थेट लोकेशन ट्रॅकिंग केलं आणि सकाळी 6 वाजताच निलंबनाची कारवाई केलेली आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सकाळी 6 वाजता नागपूरच्या हजेरी शेडला भेट दिली आहे. या ठिकाणी 9 कर्मचारी गैरहजर होते. तुकाराम मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या घड्याळावरुन त्यांचं लोकेशन ट्रॅक केलं गेले. यानंतर संबंधित कर्मचारी कामाच्या वेळी इतर ठिकाणी असल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या या 9 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप ठेवलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button