ग्राहकांना दिलासा! पुण्यातली दुकानेही आता रात्री 9 पर्यंत खुली राहणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/covid19-shops-1594140661-1.jpg)
पुणे: पुण्यात दुकानदारांना रात्री 9 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून तब्बल 30 हजार दुकानदारांना त्याचा फायदा होणार आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना व्यवसायासाठी रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी आहे पण दुकानदारांना मात्र अजूनही संध्याकाळी 7 वाजताच शटर डाऊन करावं लागत होतं त्यामुळे त्यांनीही वेळ वाढवून देण्याची मागणी केलेली होती.
व्यापाऱ्यांनी पाठपुरावा केल्याने अखेर महापालिका प्रशासनाने हा नवा निर्णय जाहीर केलेला आहे. पुण्यात एकूण 30 हजार दुकानं आहेत. काम संपवून लोक रात्री बाहेर निघतात आणि त्याच वेळेला दुकाने बंद करावी लागतात अशी अशी व्यापाऱ्यांची तक्रार होती. त्यामुळे आता दुकानेही रात्री 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सुधारीत वेळेचे आदेश जारी केलेले आहेत. अनलॉकच्या प्रक्रियेनुसार आता सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे हॉटेल्स आणि बार सुरू करण्याला परवानगी दिलेली होती.